आमचे शिक्षक

आधुनिक तंत्रज्ञान फक्त एक साधन आहे. विद्यार्ध्यांना प्रेरित करण्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्वाची आहे.

आम्हाला अभिमान आहे की टीजी गुरुकुलच्या माध्यमातून आम्ही भारतातील व्यावसायिक स्वरूपाच्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवत गुरुकुल परंपरेचा वारसा पुन्हा प्रस्थापित करत आहोत. ही शिक्षण पद्धती तयार करण्यासाठी आमच्या तज्ञ मंडळींची अनेक वर्षांची मेहनत आणि अनुभव कारणीभुत आहे. ज्यातून समर्पित शिक्षकांची निवड करणे, योग्य शिकवणी व मूल्यांकन देणाऱ्या प्रणाली आणि प्रक्रियांचा संपुर्ण आराखडा तयार झाला. आजच्या घडीला टीजी गुरुकुल मध्ये १५० सदस्यांची फळी तयार आहे ज्यात शिक्षक, शैक्षणिक सॉफ्टवेअर विकसीत करणारी तज्ञ मंडळी, अभ्यासक्रम व अभ्यास सामग्री तयार करणारी तज्ञ मंडळी ह्या सर्वांचे नेतृत्व करणारी प्रतिष्ठित अश्या आयआयटी शिक्षणसंस्थेतील तज्ञ ई. कार्यरत आहेत.

मीना नायक

मीना नायक

शिक्षण : बी.एड.एम.एस सी. भौतिक शास्त्र, मुंबई विद्यापीठ
विषय: एसएससी, सीबीएसई आणि आयसीएसई - गणित आणि विज्ञान ( भौतिक शास्त्र )
अनभुव: ५ वर्षमी आतापर्यंतर्यं एसएससी, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डच्या (इयत्ता ७,८,९ आणि १०) विद्यार्थ्याला शिकविले व मार्गदर्शन केले आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायला माझा उत्साह वाढतो. कठीण वाटणाऱ्या कॉन्सेप्ट सोप्या पद्धतीने शिकवायला मला फार आवडतं. माझ्या मते लक्षपर्वूक अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते.

ऋषिकेश जाधव

ऋषिकेश जाधव

शिक्षण : बी. इ.(इ. आणि टीसी.), पुणे विद्यापीठ
विषय: ११ वी आणि १२ वी साठी भौषिकशास्त्रािील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, जेईई, एम्स/नीट, ऑलिंपियाड, शिष्यवृत्ती परीक्षा, सीबीएसई, आयसीएसई आणि राज्य बोर्ड(भारत)
अनभुव: ७ वर्षश्री ऋषिकेश जाधव हे पुणे विद्यापीठाचे पदवीधर माजी विद्यार्थी आहे. त्याने आपल्या अध्यापन कारकीर्दीला त्याच्या पदवीच्या शेवटच्या वर्षापासून सुरुवात केली. ७ वर्षांच्या कालावधीत, त्याने विद्यार्थ्यांना मानके आणि बोर्डाच्या संपूर्ण श्रेणीतून शिकवले आहे. जेईई आणि नीट लेव्हल शिक्षणामध्येही त्यांचे कौशल्य आहे. या व्यतिरिक्त, त्यांना वायरलेस कमुनिकेशन आणि इमेज प्रोसेसिंगमध्ये उत्कृष्ट संशोधन अनुभव आहे.

सचिन बोंढारे

सचिन बोंढारे

शिक्षण : बी. इ., औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ
विषय: गणित
अनभुव: ४ वर्षशिक्षक म्हणून चार वर्ष अनुभव असलेल्या सचिन यांची बी.ई. औरंगाबाद येथून झाली आहे. शिक्षक म्हणून काम करण्याची आवड असलेल्या सचिन यांनी आतापर्यंत शेकडो मुलांना गणिताच्या छोट्या छोट्या संकल्पना समजावून सांगत त्यांच्यात गणिताची आवड निर्माण केली आहे. आतापर्यंत त्यांनी औरंगाबाद व नांदेड या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्य केले आहे. औरंगाबाद व नांदेड येथे शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट असे निकाल लावले आहे. ते विद्यार्थ्यांच्या कमकुवत असलेल्या संकल्पनांवर लक्ष देवून मजबूत करतात. ज्या ठिकाणी गणित या विषयाचा बऱ्याच विद्यार्थ्यांना शिकत असताना कंटाळा येतो विद्यार्थ्यांना मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये हसत खेळत शिकविण्याचा सचिन सरांचा स्वभाव विद्यार्थ्यांना गणितामध्ये आजूनच मजबूत करेल.

विशाल जोशी

शिक्षण : एम. एस. सी., पुणे विद्यापीठ
विषय: इयत्ता ८ वी ते १० वी गणित
अनभुव: १७ वर्षश्री विशाल जोशी यांनी गणित विषयात एम. एस. सी. केले आहे. गणित विषय शिकविण्याचा सरांना १७ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. गणित विषयातील कठीण भाग सहज व सोप्या पद्धतीने शिकविण्याच्या सवयीमुळे बरेच विद्यार्थी गणित विषयात अव्वल गुण मिळवितात. विशाल सरांच्या मते विद्यार्थ्यांचे गणित विषयातील ज्ञान पाण्याच्या प्रवाहा प्रमाणे असते त्यातील अज्ञान रूपी अडथळे दूर करणे हे शिक्षकाचे काम आहे तसे झाल्यास ज्ञानाचा प्रवाह नदीचे रूप धारण करतो.

लक्ष्मी पटवा

लक्ष्मी पटवा

शिक्षण : एम.ए., एम.एस.सी. - आय टी, मुंबई विद्यापीठ
विषय: इतिहास व नागरिकशास्त्र
अनभुव: ३ वर्षमाझे नाव लक्ष्मी पटवा आहे. मला लोकांना मदत करणे, नवीन शसकल शिकणे आवडते. विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास मनोरंजक करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा हे शिकायला आवडते. मी खूप मेहनती आहे . मला काहीतरी नवीन करायला आवडायचे.