टीजी गुरुकुल विषयी

आधुनिक शिक्षण पद्धती + तंत्रज्ञान = टीजी गुरुकुल

टूमारोस जिनिअस कॅम्पस विषयी

टूमारोस जिनिअस कॅम्पस (टीजी कॅम्पस) ह्यांचा उद्धेश प्रत्येक विद्यार्थ्याला आधुनिक शिक्षण देऊन सक्षम बनवणे हा आहे. समाजातील प्रत्येक थरातील विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती गुणांना प्रोत्साहन देत त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्यासाठी त्याला मुलभूत तसेच परीक्षांना पूरक असे शिक्षण आम्ही देतो. आमचे ध्येय आहे की ज्या विद्यार्थ्याला शिक्षणाची खरी गरज असेल त्याला आमचा उत्तम अभ्यासक्रम, अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच समर्पित शिक्षकांद्वारे वैयक्तिक पातळीवर ते दिले जाईल. टीजी कॅम्पसची टीजी गुरुकुल ही संलग्न अशी संस्था आहे.
about-1

टीजी गुरुकुल

भारतात प्राचीन काळापासून गुरुकुल ही गुरु-शिष्यामधील नाते दृढ करणारी परंपरा चालत आली आहे. ज्यामध्ये सर्व थरातील विद्यार्थी एकत्र येऊन विद्या संपादन करतात तर शिक्षक केंद्रस्थानी राहून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करत त्यांचा उत्कर्ष हेच त्याचे परमध्येय ठेवतो. सध्याच्या काळात विद्यार्थी आणि शिक्षक ह्यामध्ये एक प्रचंड दरी निर्माण झाली आहे. म्हणूनच टीजी गुरुकुलने “गुरुकुल” ह्या अनमोल अश्या परंपरेची कास धरत त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत अनोखी अशी शिक्षण पद्धती अवलंबिली आहे. त्यातूनच अनेक गावातील होतकरू, चाणाक्ष विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे.

आमची कार्यपद्धती

ह्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांचा एक लहान गट तयार केला जातो. जेणेकरून शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्याकडे वयक्तिकपणे लक्ष देता येते. अत्याधुनिक डिजिटल फळ्याच्या सहाय्याने इंटरनेटच्या माध्यमातून दृकश्राव्य प्रणालीने शिक्षक विदयार्थ्यांना शिकवतो आणि त्यांच्या शंकाचे त्वरीत निरसन करतो. जी शिकवणी सत्रे होतात त्यांचे रेकॉर्डिंग केले जाते ज्याद्वारे विद्यार्थी त्याला जेव्हां गरज भासेल तेव्हा संदर्भासाठी ती सत्रे पाहू शकतो. अश्याप्रकारे आधुनिक तंत्रज्ञान, वयक्तिक शिक्षण, प्रात्यक्षिके आणि मूल्यांकन ह्या सर्वांच्या योग्य मिलाफाने दर्जेदार शिकवणीचे एक नवे दालन तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी उघडले आहे.

आमचे शिक्षक

आम्हाला अभिमान आहे की टीजी गुरुकुलच्या माध्यमातून आम्ही भारतातील व्यावसायिक स्वरूपाच्या शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल घडवत गुरुकुल परंपरेचा वारसा पुन्हा प्रस्थापित करत आहोत. ही शिक्षण पद्धती तयार करण्यासाठी आमच्या तज्ञ मंडळींची अनेक वर्षांची मेहनत आणि अनुभव कारणीभुत आहे. ज्यातून समर्पित शिक्षकांची निवड करणे, योग्य शिकवणी व मूल्यांकन देणाऱ्या प्रणाली आणि प्रक्रियांचा संपुर्ण आराखडा तयार झाला. आजच्या घडीला टीजी गुरुकुल मध्ये १५० सदस्यांची फळी तयार आहे ज्यात शिक्षक, शैक्षणिक सॉफ्टवेअर विकसीत करणारी तज्ञ मंडळी, अभ्यासक्रम व अभ्यास सामग्री तयार करणारी तज्ञ मंडळी ह्या सर्वांचे नेतृत्व करणारी प्रतिष्ठित अश्या आयआयटी शिक्षणसंस्थेतील तज्ञ ई. कार्यरत आहेत.

पुढचे पाऊल

आजतागायत टीजी गुरुकुलने सहावी ते बारावी मधील ५०००+ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे आणि दिवसागणिक ही संख्या वाढत आहे. पुढील वर्षापर्यंत २५००० विद्यार्थ्यांना ह्या मध्ये सामील करण्याचा आमचा मानस आहे आणि ते लक्ष आम्ही नक्कीच पूर्ण करू असा आम्हाला विश्वास वाटतो. सध्या आमच्या शाखा भारतातील प्रमुख शहरांमध्ये कार्यरत आहेत पण भविष्यात पहिल्या आणि दुसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये न्हेण्याची आमची योजना आहे.